ट्रम्प यांचे मंत्री आणि अधिकारी भिडले!

जगातील सात युद्धे थांबवल्याची टिमकी वाजवणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकार व प्रशासनामध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. एका डिनर पार्टीत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि याच खात्याचे अधिकारी बिल पुल्टे यांच्यात राडा झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. आयोजकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा वाद शांत झाला.