IPL 2026 आधी मोठा फेरबदल! 20 खेळाडूंना बाहेरचा रस्ता तर, 23 कोटींचा खेळाडूही यादीमध्ये सामील
आईपीएल 2026च्या (IPL 2026) आधी रिटेन्शनकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 15 नोव्हेंबर 2025, म्हणजेच उद्या, कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणाला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार हे स्पष्ट होईल. मागील सीजनमध्ये अनेक खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला नव्हता आणि त्यामुळे आयपीएल ऑक्शनपूर्वी पर्स मोकळी करण्यासाठी टीम त्यांना रिलीज करू शकते. शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) आणि शरफेन रदरफोर्ड यांसारख्या काही खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट येण्याआधीच ट्रेड झाली आहे. एकूण 20 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे निश्चित दिसत आहे.
प्रत्येक टीममध्ये किमान दोन खेळाडू असे आहेत, ज्यांना रिलीज केले जाऊ शकते. CSK मधून रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांना रिलीज केले जाऊ शकते.
मुंबई इंडियन्स दीपक चहरला रिलीज करू शकते, तर KKR वेंकटेश अय्यरला सोडू शकते.
वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) कोलकात्याने गेल्या वर्षी 23.75 कोटींमध्ये खरेदी केले होते, पण त्यांचा परफॉर्मन्स समाधानकारक नव्हता. त्यामुळे त्याचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.