होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पेटलेल्या जहाजावरून 24 हिंदुस्थानी खलाशांची नौदलाकडून सुटका; इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचे वाढले टेन्शन
इराण आणि अमेरिकेत शांतीकराराची चर्चा सुरू असताना लागू झालेली युद्धबंदी काही काळासाठी मोडली गेली. इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केल्याचे प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले करत क्षेपणास्त्रांचा मारा केला. मात्र, काही तासांनी ही कारवाई थांबवण्यात येत असल्याचे इराणने जाहीर केले. नव्याने उफाळून आलेल्या संघर्षात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका तेल टँकरवरही हल्ला करण्यात आला. त्यातील 24 हिंदुस्थानी खलाशांची हिंदुस्थानी नौदलाकडून थरारक सुटका करण्यात आली.
इराणने इस्रायलवर 30 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्याचवेळी हुती बंडखोरांनीही दोन क्षेपणास्त्रे डागली. त्याचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेदेखील इराणवर दोन टप्प्यात हल्ले केले. आजचे हल्ले हे इस्रायलने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर होते, असे इराणने स्पष्ट केले. या हल्ल्यातून इस्रायलने धडा शिकला पाहिजे. सध्या ही कारवाई थांबवण्यात येत आहे. मात्र, इस्रायलने कारवाई सुरूच ठेवली किंवा दक्षिण लेबनॉनमध्ये पुन्हा हल्ले केले, तर पूर्वीपेक्षा जास्त कठोर उत्तर दिले जाईल, असे इराणच्या सैन्याने एका अधिकृत निवेदनातून इशारा दिला तर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आम्हाला थांबवायचा आहे. अंतिम करार होईपर्यंत होर्मुझची नाकेबंदी कायम राहील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थानी नौदल धावले मदतीला
होर्मुझजवळ एका तेलाच्या टँकरवर हल्ला झाला. त्यात टँकरला आग लागली होती. जहाजावर 24 हिंदुस्थानी खलाशी होते. त्यांनी मदतीसाठी हिंदुस्थानी नौदलाला मदत मागितली होती. त्यानंतर नौदलाने तत्काळ पावले उचलत आग लागलेल्या तेलाच्या टँकरमधून या खलाशांना एअर लिफ्ट केले. दरम्यान, हिंदुस्थानी सरकारने इराणमधील सर्व भारतीयांना तत्काळ इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Comments are closed.