मध्य रेल्वे चालवणार 250 गणपती स्पेशल ट्रेन्स, चाकरमान्यांना बाप्पा पावला! 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेने खूशखबर दिली आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 22 ऑगस्टपासून 250 गणपती स्पेशल ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण 24 जुलैपासून सुरू केले जाणार आहे.
गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला असतानाच शुक्रवारी मध्य रेल्वेने जादा गाडय़ांची घोषणा केली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दैनिक विशेष (40 सेवा), सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी दैनिक विशेष (36 सेवा), सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी दैनिक विशेष (36 सेवा), एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी दैनिक विशेष (36 सेवा), एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी दैनिक विशेष (36 सेवा), एलटीटी-मडगाव- एलटीटी साप्ताहिक विशेष (4 सेवा), एलटीटी-मडगाव- एलटीटी एसी साप्ताहिक विशेष (6 सेवा), पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (6 सेवा), पुणे-रत्नागिरी एसी साप्ताहिक विशेष (6 सेवा), दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (38 सेवा) अशा प्रकारे 250 गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
Comments are closed.