गुजरातमध्ये ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरातमधील गिर सोमनाथ परिसरात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सोमवारी सकाळी 10:51 वाजता गुजरातच्या गिर सोमनाथ जिह्यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तथापि, कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. या तीव्रतेचे भूकंप सामान्य मानले जातात आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Comments are closed.