IND vs SA: ODI मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीमध्ये होणार अनपेक्षित बदल? रोहित-कोहलीची चिंता वाढली

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (Test series in between IND vs SA) दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर, 30 नोव्हेंबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी BCCI लवकरच टीम इंडियाची घोषणा करणार आहे. पण त्याआधीच वनडे मालिकेसाठी टीम निवडीबाबत 5 मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत.

या मालिकेत भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) पुन्हा मैदानात उतरतील. कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या दोघांनी अलीकडेच ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत दमदार पुनरागमन करून शानदार खेळ केला होता.

मात्र, आता या मालिकेत खेळण्यापूर्वी रोहित आणि विराटच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी त्यांच्या निवडीबाबत एक महत्त्वाची अट ठेवली आहे.

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी या दोघांचीही थेट निवड होणार नाही. त्यासाठी रोहित आणि विराट यांनी विजय हजारे ट्रॉफीत भाग घेणे अनिवार्य असेल. तसेच, या मालिकेनंतरही टीममध्ये टिकून राहण्यासाठी दोघांनाही घरेलू क्रिकेटमध्ये खेळणे आवश्यक असेल.

दुसरीकडे, श्रेयस अय्यर (Shreyas iyer) दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर राहणार आहे. मात्र, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik pandya) पूर्णपणे फिट झाला असून, तो या मालिकेत पुनरागमनासाठी सज्ज आहे.

Comments are closed.