म्हाडाच्या 5285 घरांसाठी पाच दिवसांत 7421 अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसई येथील 5285 घरांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला होता. या घरांसाठी पाच दिवसांत म्हणजेच शनिवारी सायंकाळपर्यंत तब्बल 7421 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 2499 जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरले आहेत.

कोकण मंडळाच्या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एपूण 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 घरे तसेच 50 टक्के योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत कल्याण तिसगाव येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घराची किंमत 9 लाख 55 हजार रुपये आहे, तर लॉटरीतील सर्वात महागडे घर ठाण्यातील बाळपूम येथे आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या या घराची किंमत 84 लाख 85 हजार रुपये आहे.

Comments are closed.