Health Tips: प्रोटीनने समृद्ध असतात हे शाकाहारी पदार्थ; तज्ञांनीच सांगितले फायदे

फिट अँड फाईन राहण्यासाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असा समज होतो की प्रोटीन हे किवळ मांसाहारी पदार्थांत जास्त प्रमाणात असतं. मात्र काही शाकाहारी पदार्थ हे प्रोटीनने समृद्ध असतात. हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने अनेक फायदे होतात. ( Veg food list that are ric in protien )

डाळ, कडधान्य
डाळ आणि कडधान्य हे प्रथिने, तसेच फायबर आणि आवश्यक खनिजांचे चांगले स्रोत मानले जातात. पिवळ्या आणि हिरव्या डाळींमधून शरीराला साधारण ९ – १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. तुमच्या दैनंदिन आहारात हे पदार्थ समाविष्ट केल्यास शरीराला फायदा होतो.

शेंगदाणे
शेंगदाणे प्रथिनांनी समृद्ध असतात आणि ते व्हिटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत.

ड्रायफ्रुट्स आणि बिया
बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, आणि चिया सीड्स यांसारख्या बिया आणि ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने प्रथिनांची कमतरता भरून निघू शकते.

टोफू किंवा सोयाबीन
सोयाबीनमध्ये नऊ अमीनो आम्ले असतात. तर १०० ग्रॅम टोफूमध्ये सुमारे १० ग्रॅम प्रथिने असतात. सोयाबीनमध्ये फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात, तर टोफूमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात. त्यामुळे आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

कॉटेज चीज आणि ग्रीक दही
१०० ग्रॅम कॉटेज चीजमध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रथिने असतात, तर १०० ग्रॅम ग्रीक दह्यात सुमारे १० ग्रॅम प्रथिने असतात. मात्र कॉटेज चीजमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मर्यादित प्रमाणात ते खाणं चांगलं असतं. तसेच दूध, दही आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते. आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ मांसाहारी पदार्थांची गरज नाही तर तुम्ही आपल्या आहारामध्ये दुधाचे, दह्याचे आणि पनीरचे अनेक पदार्थ समाविष्ट करून घेऊ शकता.

क्विनोआ
क्विनोआ हे एक प्रकारचे धान्य आहे. जे दक्षिण अमेरिकेतून भारतामध्ये आले आहे. हे स्वादिष्ट असण्यासोबतच अतिशय पौष्टिक देखील आहे. क्विनोआमध्ये प्रथिने आणि फायबर दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. रोटी, उपमा, पोहे, कोशिंबीर इत्यादी स्वरूपात याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये इतर अनेक भाज्यांपेक्षा जास्त प्रथिने असतात आणि ते सॅलड, सूप किंवा पास्त्यामध्ये टाकून खाऊ शकता.

Comments are closed.