आई वडील नसतील तर मुलीचे कन्यादान कोणी करावे?

हिंदू विवाह पद्धतीमद्ये कन्यादानाला विशेष महत्व आहे. कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. यामुळे ज्यांना कन्यादानाचा अधिकार मिळतो ते भाग्यवान समजले जातात. पण कन्यादान हा केवळ लग्न विधी नसून त्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण आहे.
यामुळे कन्यादान म्हणजे कन्येचे दान नसून तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात ज्या व्यक्तीबरोबर होणार असते त्या नवऱ्या मुलावर नवरी मुलीची जबाबदारी सोपवणे. नवऱ्या मुलीचे आई वडील हा विधी करतात.

पण ज्या वधूला आईवडील नाहीत अशावेळी तिचा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण हा विधी करू शकते. भाऊ बहीण यांनाही आईवडीलांसमान असल्याने ते ही बहीणीचे कन्यादान करू शकतात. कारण ते तिचे सख्खे रक्ताचे नातेवाईक असतात. तसेच जर मुलीचे आजी आजोबा जिवंत असतील तर ते ही तिच्या आईवडीलांच्या जागी कन्यादान करू शकतात. प्रामुख्याने य़ा व्यक्ती घरातील ज्येष्ठ असल्याने कुटुंबाचे ते प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांनाही लग्नविधीत विशेष मान सन्मान असतो.

तर काही ठिकाणी काका-काकू, मामा मामीही भाची किंवा पुतणीचे कन्यादान करतात. पण जर मुलीला नातेवाईकच नसतील तर अशावेळी धर्माप्रमाणे वराचे म्हणजेच नवरदेवाचे आई वडीलही नवऱ्या मुलीचे कन्यादान करू शकतात. कारण सून ही मुलगीच असते.

Comments are closed.