आयुर्वेदानुसार PCOS ग्रस्त महिलांनी हे पदार्थ खाणे टाळावेत
सध्या भारतातील प्रत्येक 10 स्त्रियांपैकी अथवा मुलींपैकी एक मुलगी PCOS / PCOD या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून येते. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताण आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना हा त्रास होत आहे. PCOS म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ किंवा ‘पीसीओएस’. या आजारामुळे स्त्रियांमधील प्रजनन संप्रेरक (Hormones) कमी होऊन पुरूष संप्रेरकाचे प्रमाण वाढते. स्त्रियांमध्ये पुरुषांचे संप्रेरक वाढल्याने त्यांना मासिक पाळी योग्य वेळी येत नाही. पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर आणि छातीवर केस वाढतात आणि बाळंतपणाच्या क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदानुसार PCOS ग्रस्त महिलांनी आहाराकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगण्यात आले आहे.
आयुर्वेदानुसार PCOS ग्रस्त महिलांनी असे अन्नपदार्थ खावेत ज्यामुळे त्यांचे वजन वाढणार नाही. कमी GI (ग्लायसेमिक इंडेक्स) असणारे पदार्थ खावेत. या पदार्थांमुळे जास्त वेळ भूक लागत नाही आणि चरबीचे पचन होते. परिणामी, वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे आज आपण आयुर्वेदानुसार PCOS ग्रस्त महिलांनी कोणते पदार्थ खाणे टाळावेत हे पाहूयात.
शुद्ध धान्य –
मैदा, कोंडा नसलेल्या पिठात GI खूप जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते. यासाठी भरड धान्य जसे की लाल तांदूळ, बाजरी खावी.
हेही वाचा – Cashew Benefits : आहारात करा काजूचा समावेश, राहाल निरोगी
शुद्ध तेल –
PCOS ग्रस्त महिलांनी आहारात रिफाइंड तेलाचा वापर कमी करावा. त्याऐवजी देशी तूप खावे.
रॉक मीठ –
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे PCOS ग्रस्त महिलांनी रॉक सॉल्टऐवजी काळे मीठ खावे.
साखर –
PCOS ग्रस्त महिलांसाठी साखर धोकादायक पदार्थ आहे. अशा महिलांनी आहारात साखरेऐवजी गूळ आणि मधाचा वापर करावा.
हेही वाचा – Rose Benefits : गुलाब अनेक आजारांवर प्रभावी औषध, वाचा चमत्कारीक फायदे
Comments are closed.