Desk Exercises : डेस्क एक्सरसाइज करून कमी करा सुटलेलं पोट

बऱ्याचजणांचे डेस्क जॉब असल्याने सतत एका जागी बसून पोटाची चरबी वाढते. या वाढणाऱ्या पोटाच्या चरबीलाच ‘बेली फॅट’ म्हटलं जातं. तुम्हालाही या वाढत्या चरबीचा त्रास होतोय का? जिममध्ये जाण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही का? असं जरी असलं तरी काळजी करण्याचं फारसं काही कारण नाही. ऑफिसमध्ये डेस्कवर बसूनही तुम्ही काही सोपे व्यायाम करून पोटाची चरबी कमी करू शकता. जाणून घेऊयात काही असे व्यायाम प्रकार जे तुम्ही बसल्या जागीच करून तुमचं बेली फॅट कमी करू शकता.

डेस्क व्यायाम –

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी केले जाणारे हे व्यायाम प्रकार ऑफिस डेस्कवरच केले जातात. ज्यामुळे त्यांना ‘डेस्क एक्सरसाइज’ असं म्हटलं जातं.

पाय वाढवणे –

तुमच्या खुर्चीवर सरळ बसा आणि पाय जमिनीपासून किंचित वर उचला. यानंतर पाय वर-खाली हलवा.

हेही वाचा – Secrets of Long Life: …म्हणून १०० वर्षे जगतात माणसं; हे आहे गुपित !

वासराचा राग –

खुर्चीवर पायांच्या बोटावर उभे राहा आणि नंतर हळूहळू पाय खाली करा. हा व्यायामामुळे पायांचे स्नायू मजबूत होतील.

सीटेड चेअर ट्विस्ट –

सीटेड चेअर ट्विस्टच्या सरावामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि स्नायू ताणले जातात. यामुळे दीर्घकाळ बसून होणारा त्रास कमी होतो आणि स्थूलतेला कारण मिळत नाही.

खांदा फिरवणे –

खुर्चीत सरळ बसून खांदे मागे-पुढे वाकवावेत. यामुळे आराम मिळतो .

पोटाची चरबी कमी करण्यासाठी इतर टिप्स –

  • दिवसभर भरपूर पाणी प्यावे.
  • फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त आहार घ्यावा.
  • वजन वाढण्यामागे ताण असू शकतो. त्यामुळे ताणापासून दूर राहावे.
  • रात्री 7 ते ८ तासांची झोप घ्यावी.

(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – Pasteurized Milk Boiling Tips : बाजारातील पॅकेज्ड दूध उकळावे की नाही?

Comments are closed.