Winter Health: कडू कारलं हिवाळ्यात ठरतं आरोग्यदायी, सर्दीपासून मिळतो आराम; वाचा फायदे !
कारलं ही जवळपास सर्वांचीच नावडती भाजी असते. मात्र तीच कडू भाजी हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारल्यात ए, सी आणि बी9 सारखे जीवनसत्त्वे, फोलेट भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यात लोह, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे खनिजे देखील असतात. कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हिवाळ्यात कारलं खाण्याचे फायदे जाणून घेऊया.. ( Benefits of Bitter Gourd In Winter )
आरोग्य तज्ञांच्या मते, कारलं पोषक तत्वांनी समृद्ध आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते.
हिवाळ्यात पचनाच्या समस्या वाढतात. कारल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या आजारापासून आराम मिळतो. शिवाय दमा, खोकला आणि सर्दी यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी होतात.
हिवाळ्यात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या ऋतूत कारल्यासह व्हिटॅमिन सी समृद्ध फळे, जसे की लिंबूवर्गीय फळे, किवी आणि शिमला मिरची, मेथी सारख्या भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात. तसेच सूप, आलं आणि तुळशीचा चहा आणि हळदीचे दूध घेणंही फायदेशीर ठरतं.
Comments are closed.