Child Healthcare: मुलांचं वजन कमी असल्यास आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

आजकाल मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे खूपच कठीण बनले आहे. योग्य आहार न दिल्यास त्यांचं वजन वाढत नाही. त्यामुळेच मुलांच्या वाढीसाठी त्यांना योग्य पोषण मिळणं आवश्यक आहे. जर तुमची मुले कमकुवत असतील आणि त्यांचे वजन वाढत नसेल तर काही पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करा. यामुळे मुलांचं वजन वाढेल आणि त्यांच्या विकासासाठीही फायदा होईल. ( These Foods Help to Gain weight for Chidlren )

शुद्ध तूप
आरोग्य तज्ञांच्या मते, मुलांना घरी बनवलेले शुद्ध तूप दिल्याने त्यांचे वजन चांगले वाढते. तुपातील जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

सुकामेवा
मुलांना सुकामेवा देणे चांगले ठरतं. त्यात लोह, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर असतात. ते हाडे मजबूत करण्यास आणि स्नायूंच्या विकासासाठी फायदेशीर असतं.

तीळाचे लाडू
तीळाचे लाडू हे मुलांसाठी पौष्टिक ठरतात. तिळातील कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रथिने हाडे मजबूत करण्यास, अशक्तपणा कमी करण्यास आणि स्नायूंच्या विकासासाठी मदत करतात.

केळी
मुलांना केळी दिल्याने त्यांना नैसर्गिक ऊर्जा, पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे मिळतात. हे वजन वाढवण्यास मदत करतात. शिवाय, हे फळ पचण्यास हलकं आहे.

अंडी
अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, लोह आणि इतर पोषक घटक असतात. हे मेंदूच्या विकासासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. तसेच मुलांना दररोज एक अंडे दिल्याने त्यांचे वजन वाढण्यास मदत होते.

टीप- ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments are closed.