Unwanted Hairs: मुलींच्या चेहऱ्यावर मुलांसारखी दाढी- मिशी का येत आहे? रशियाच्या WHO ने सांगितलं कारण
आजकाल त्वचेशी संबंधित समस्या जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. हल्ली मुलींना मुलांप्रमाणे दाढी- मिशी येत आहे. म्हणजेच मुलींच्या चेहऱ्यावर नको असलेले केस येतात. यावर अनेक महिला उपचार घेतात. यामागचं प्रमुख कारण हे हॉर्मोनल असंतुलन असल्याचं सांगितलं जातं. मात्र आता नुकतंच रशियाच्या WHO ने यामागील काही कारणं सांगितली आहेत. ( Reason Of Unwanted hairs on face )
रशियन वेबसाइट इझवेस्टियानुसार, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि मिठाईसारख्या फास्ट फूड पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असते. यामुळं इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते. या इन्सुलिनमुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते आणि महिलांमध्ये पुरुष हार्मोनची पातळी वाढवते. यामुळे मुलींच्या चेहऱ्यावरील केस वाढतात. फास्ट फूडमुळे वजन वाढते, हार्मोनल असंतुलन होतं आणि चेहरा, हनुवटी, भुवयांभोवती केसांची वाढ होते. या परिस्थितीला हर्सुटिझम ( Hirsutism) असं म्हणतात.
हेही वाचा: Homemade Winter Cream: गोकर्णाच्या फुलापासून घरीच बनवा नैसर्गिक विंटर क्रीम
अहवालानुसार, मासिक पाळी सुरू झाल्यावर मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. या काळात फास्ट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने केसांची वाढ होण्याचा धोका वाढू शकतो. हे नको असलेले केस मुली अनेकदा रेझर वापरून काढतात, मात्र यामुळं समस्या आणखी वाढू शकते.
उपचार
हार्मोनल असंतुलनाचे निदान करून योग्य उपचार घेऊन ही समस्या कमी करता येते. आहार आणि जीवनशैलीतील बदल हे देखील प्राथमिक उपचार आहेत. तज्ञांच्या सल्ल्याने लेसर उपचार देखील घेऊ शकता, मात्र घरगुती उपचार उपाय करून हे केस काढणं टाळा.
Comments are closed.