Red Suits For Bride: नव्या नवरीसाठी रेड सूट; ट्रेंडिंग आहेत ‘हे’ डिझाईन

बऱ्याचदा लग्नानंतर सासरी घालण्यासाठी चांगले ड्रेस हवे असतात. अशावेळी नव्या नवरीला काही लाल रंगाचे सूट शोभून दिसतात. आजकाल हे सूट प्रचंड ट्रेंडिंग आहेत. ज्यावेळी तुम्हाला साडीऐवजी एक पारंपरिक आऊटफिट हवं असेल तेव्हा तुम्ही नक्कीच हे सूट घालू शकता. यामध्ये विविध पॅटर्न आणि डिझाइन्स असतात, जे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकता. ( Trending Red Suit Designs For Newly Wed Bride )

बांधणी प्रिंट रेड सूट
सुंदर लूकसाठी तुम्ही बांधणी प्रिंट रेड सूट स्टाईल करू शकता. हे बांधणी प्रिंट सूट खूप आकर्षक दिसतात. ओढणीवर बॉर्डर वर्क असतं. यामुळे संपूर्ण सूट खूपच सुंदर दिसेल. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगासाठी ते स्टाईल करू शकता. बाजारात या सुटीची किंमत ७०० ते १००० रुपये असते.

लाल भरतकाम केलेला सूट
नव्या नवरीला रेड एम्ब्रॉयडरी वर्क सूट शोभून दिसतात. यावर एम्ब्रॉयडरी वर्क असल्याने हेव्ही आणि शाही लूक येतो. कुर्त्यावर हेव्ही तर पॅन्ट आणि ओढणीवर साधी डिझाईन असते.

हेही वाचा: Bride Jewellery Shopping: लग्नासाठी नववधुची ज्वेलरी घेताय? मग ‘या’ चुका टाळा; अन्यथा बिघडेल लूक

लाल शरारा सूट
शरारा सूट हा कोणत्याही खास प्रसंगी शोभून दिसतो. तसेच हा सूट तुम्हाला पारंपरिक लूक देतो. हे सूट जास्त आकर्षक दिसतात. हेव्ही वर्कचा शरारा सूट तुम्हाला परिपूर्ण लूक देतात. यावर तुम्ही सूट होणारी गोल्डन कलर ज्वेलरी घालू शकता.

प्रिंटेड पॅटर्न रेड सूट
जर तुम्हाला जास्त हेव्ही सूट नको असेल पण तरी पारंपरिक लूक हवा असेल. तर प्रिंटेड पॅटर्न रेड सूट चांगला पर्याय ठरतात. यावर वेगवेगळ्या प्रकारचं प्रिंटेड वर्क असतं. ज्यामुळं पारंपरिक लूक मिळतो आणि हा सूट आरामदायी ठरतो.

हेही वाचा: Wedding Gifts: लग्नात वधू- वराला द्या हे भन्नाट गिफ्ट्स; आयुष्यभर राहील त्यांच्या लक्षात

Comments are closed.