Trolley Bag Cleaning: तुमची Trolley Bag मळकट दिसते? मोजके घटक वापरून करा स्वच्छ

प्रवासाला निघायचं म्हंटलं की ट्रॉली बॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये भरपूर सामान बसतं, शिवाय ती हँडल करायलाही सोपी असते. मात्र सततच्या वापरामुळे ती बॅग मळकट दिसते. त्याचा रंग फिका पडतो. अशावेळी सोपी पद्धत वापरून तुम्ही ती बॅग स्वच्छ करू शकता. यामुळं ती पुन्हा एकदा नव्यासारखी दिसेल. अगदी ५ मिनिटांत हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. ( Tips to clean Trolley Bag without washing )

बेकिंग सोडा, व्हिनेगर
हा उपाय करण्यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस, व्हिनेगर, बेकिंग सोडा घाला. अशा प्रकारे तुमचं क्लिनिंग लिक्विड तयार आहे. आता एक कापसाचे कापड घ्या. ते कापड तयार पाण्यात बुडवून पिळून घ्या. नंतर ट्रॉली बॅग या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. यामुळे सर्व घाण निघून जाईल आणि ५ मिनिटांत ट्रॉली बॅग नव्यासारखी दिसेल.

गरम पाणी आणि मीठ
जर तुमच्या ट्रॉली बॅगमध्ये खूप धुळीचे कण जास्त असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि मीठ वापरू शकता. हे दोन्ही घटक मिसळून सुती कापडाने बॅग पुसून घ्या. नंतर उन्हात बॅग वाळवून घ्या. यामुळे ती स्वच्छ होईल.

हेही वाचा: Warm Room Tips: हिटरशिवाय खोली ठेवा उबदार; हे उपाय केल्यास कमी जाणवेल थंडी

व्हील असे ठेवा स्वच्छ
प्रवासाच्या आधी बॅगच्या चाकांवर साधा प्लास्टिक टेप लावल्यास ते घाण, धुळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतात. हा उपाय बॅगची चाके नव्यासारखी टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे. प्रवासानंतर टेप सहज काढता येतो आणि चाके नव्यासारखी दिसतात.

Comments are closed.