Food Trend : खाद्यसंस्कृतीचा नवा ट्रेंड, ग्रोसरी टुरिझमची तरुणांमध्ये क्रेझ

गेल्या काही वर्षात जगभरात पर्यटनाची व्याख्या बदलली आहे. पर्यटक केवळ ऐतिहासिक वास्तू किंवा समुद्रकिनारे पाहण्यासाठी फिरत नाही तर त्या ठिकाणची जीवनशैली कशी आहे ते समजून घेत आहे. यालाच ग्रोसरी टुरिझम असं नाव देण्यात आलं आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर  एखाद्या नवीन ठिकाणी फिरताना तिथल्या स्थानिक किराणा दुकानांना, भाजी मार्केटला आणि मोठ्या सुपरमार्केट्सना भेट देणे म्हणजे ‘ग्रोसरी टुरिझम’. हा ट्रेंड प्रामुख्याने तरुण पिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.

कारणे –

एखाद्या ठिकाणची खरी संस्कृती तिथल्या रोजच्या खाण्यापिण्यातून आणि जगण्यातून समजते. सुपरमार्केटमधील गर्दी आणि तिथे मिळणाऱ्या वस्तू पाहून तिथल्या लोकांची लाईफस्टाईल जवळून अनुभवता येते.

आपल्या देशात न मिळणाऱ्या चिप्सचे फ्लेव्हर्स, वेगवेगळ्या चॉकलेट्स, सॉस किंवा शीतपेये शोधून त्यांची चव घेण्यात पर्यटकांना प्रचंड आनंद मिळत आहे.

हेही वाचा – Monsoon Preparation: पावसाळ्यापूर्वी घरात ‘या’ गोष्टी ठेवा तयार; नाहीतर ऐनवेळी होईल धावपळ

पारंपरिक शो-पीस किंवा कपडे खरेदी करण्याऐवजी, पर्यटक आता घरी परतताना तिथल्या खास स्थानिक चटण्या, सेंद्रिय मसाले, चहा पावडर किंवा स्नॅक्सआणि स्वतःसाठी आठवण म्हणून विकत घेतात.

या ठिकाणांना पर्यटकांची पहिली पसंती

जपान – जपानमधील 7-Eleven, Lawson, आणि FamilyMart ही स्टोअर्स पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहेत.

दक्षिण कोरिया – सोल मधील 24 तास उघडी असणारी सुपरमार्केट्स, जिथे पर्यटक स्वतः इन्स्टंट नूडल्स बनवून खाऊ शकतात. त्यामुळे तरूण येथेही जाण्यास पसंती दर्शवत आहेत.

इटली – इटली हे फूड लव्हर्ससाठी नेहमीच ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले गेले आहे, पण आता लोक फॅन्सी हॉटेल्स सोडून तिथल्या स्थानिक बाजारपेठांना भेट देत आहेत.

थायलंड जेट – अप्रतिम चवीसाठी थायलंडच्या फूड मार्केटला पर्यटकांची मोठी पसंती असते. बँकॉकची पाण्यावर तरंगणारी बाजारपेठ जिथे बोटींमधून ताज्या भाज्या, फळे आणि गरम स्ट्रीट फूड विकले जाते.

स्पेन – र्सेलोनामधील ‘ला बोकेरिया’ हे जगातील सर्वात प्रसिद्ध फूड मार्केट्सपैकी एक आहे. तिथे मिळणारे रंगीबेरंगी ताजे ज्यूस, सुकामेवा आणि स्पॅनिश मसाले पर्यटकांना आकर्षित करतात.

हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ शिवमंदिराचं फक्त उन्हाळ्यातच होतं दर्शन

Comments are closed.