पदार्पण असावे तर असे ! 6 विकेट्स घेऊन मानव सुथार चर्चेत आला अन् 35 वर्षांनी इतिहास घडला…





मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 300 धावांसह दणदणीत विजय मिळवला. यावेळी फलंदाजी असो किंवा गोलंदाजी सुरुवातीपासूनच भारताने आपला दबदबा कायम ठेवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 8 विकेट्स गमावत 564 धावांचा मोठा डोंगर उभारला. पण या बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या अफगाणी फलंदाजांचे नवख्या आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या मानव सुथारने चांगलेच कंबरडे मोडले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात 6 विकेट्स घेत इतिहास रचला आहे.



Comments are closed.