डेंग्यू, मलेरिया आणि सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी हे घरगुती काढे ठरतील वरदान

पावसाळा सुरू झाला की हवेतील आर्द्रता आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढते. परिणामी डेंग्यू, मलेरिया यांसारखे गंभीर आजार आणि वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास अनेकांना जाणवतो. अशावेळी या आजारांशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. आज आपण आयुर्वेदात या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी काही काढे सांगितले आहेत याची माहिती घेऊयात.

गुळवेलीचा काढा

गुळवेल ताप कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. डेंग्यूमध्ये हा काढा विशेष फायदेशीर ठरतो.

बनवण्याची पद्धत – गुळवेलीचा छोटा तुकडा दोन कप पाण्यात उकळा. पाणी निम्मे झाल्यावर गाळून कोमट असताना पिऊन घ्या.

हेही वाचा – दूषित पाणी आणि डासांमुळे पावसाळ्यात होतात हे आजार

पपईच्या पानांचा रस

डेंग्यूमध्ये  रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्सची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा रस गुणकारी मानला जातो.

बनवण्याची पद्धत – पपईची ताजी पाने आणि 4  कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून एकत्र वाटून घ्या. त्याचा रस गाळून दिवसातून दोन वेळा 2 चमचे प्या.

दालचिनी आणि हळद

दालचिनी आणि हळदीमधील ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे संसर्गांपासून संरक्षण करतता.

बनवण्याची पद्धत – पाण्यात एक छोटा तुकडा दालचिनी आणि चिमूटभर हळद टाकून उकळवा. गाळल्यानंतर त्यात एक चमचा मध मिक्स करून कोमट असतानाच प्या.

तुळस, आले आणि काळी मिरी

हा चहा गळ्यातील खवखव कमी करतो, छातीतील कफ काढून श्वसनमार्ग साफ ठेवतो.

बनवण्याची पद्धत – दीड कप पाण्यात 9 ते 10 तुळशीची पाने, किसलेले आले आणि 4 ते 5 काळ्या मिऱ्या कुस्करून टाका. हे मिश्रण 10 मिनिटे उकळवून घ्या, गाळा आणि गरम चहाप्रमाणे प्या.

महत्त्वाची टिप –

हे घरगुती उपाय शरीराला अंतर्गत ताकद देण्यासाठी आहेत. जर ताप खूप जास्त असेल, उलट्या होत असतील किंवा प्लेटलेट्स कमी होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा – वाढत्या Breast Cancerला जीवनशैली जबाबदार? या सवयी वेळीच बदला, नाहीतर…

Comments are closed.