बेटल लीफ: विद्या पाने योग्य आहेत

आपल्या देशात फार पूर्वीपासून जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची परंपरा आहे. बऱ्याच जणांचा विड्याचे पान म्हणजे जेवणानंतरचा मुखवास असतो. विड्याच्या पानांना नागवेलीची पाने किंवा खाण्याची पाने असे देखील म्हटले जाते. या पानांना देवाच्या पूजेत विशेष मान असतो. विड्याच्या पानांमध्ये विविध गुणधर्म असल्याने आरोग्यासाठीही ती फायदेशीर असतात. यात कॅल्शियम, प्रोटिन, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी सारखी अनेक पोषकतत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय तुम्ही दररोज सकाळी जर विड्याच्या पानांचे पाणी प्यायल्यात तर आरोग्याच्या विविध तक्रारी कमी होतात.  महिलांनी तर आवर्जून विड्याचे पान खायला हवे. आज आपण जाणून घेऊयात विड्याचे पान खाण्याचे फायदे

फायदे –

  • विड्याच्या पानांमध्ये ऍटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतता. तुम्ही जर दररोज विड्याच्या पानांचे पाणी प्यायल्यात तर तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास सुरुवात होईल.
  • याशिवाय विड्याचे पान खाल्ल्याने हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि दात मजबूत होतात.
  • विड्याचे पान खाल्ल्याने युरिक ऍसिडची पातळी कमी होते. या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी कमी करण्यासाठी मदत करतात.
  • शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी विड्याची पाने अवश्य खावीत. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही विड्याची पाने चावलीत तर यकृत आणि किडनी स्वच्छ होईल, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारेल आणि चेहराही टवटवीत दिसेल.
  • विड्याच्या पानांमध्ये ऍटी-ऑक्सिंडट्स आणि ऍटी-इफ्लेमेंटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • विड्याचे पान खाल्ल्याने लाळेचे उत्पादन वाढते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. परिणामी, अपचन, गॅस आणि छातीत जळजळ यासारख्या तक्रारी कमी होतात.
  • विड्याच्या पानाच्या सेवनाने जखम लवकर भरते. जखम भरण्यासाठी पानांमधील ऍटीसेप्टिक गुणधर्म उपयुक्त ठरतात.
  • विड्याच्या पानांमुळे डोकेदुखी कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला विड्याचे पान कपाळावर लावायचे आहे.
  • दररोज एक विड्याचे पान खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे पोटाची पीएच पातळी सामान्य राहते आणि भूक वाढते.
  • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, विड्याचे पान लैंगिक उत्तेजक म्हणून कार्य करते. तुम्ही हे पान नक्कीच खाऊ शकता.

पण, हे सर्वांच्याच आरोग्यासाठी परिणामकारक ठरेल हे सांगता येत नाही. त्यामुळे विड्याचे पान खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.