डिटॉक्स ड्रिंक्स: ताजे, चमकणारी स्किनसती प्या तो डिटॉक्स ड्रिंक्स

प्रत्येकाला आपली त्वचा फ्रेश आणि चमकदार हवी असते. पण, वाढतं प्रदुषण, रोजची धावपळ, चुकीचं खाणं पिणं यामुळे आरोग्यासह त्वचेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत, फ्रेश, ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यामध्ये फ्रेश आणि ग्लोइंग स्किनसाठी डिटॉक्स ड्रिंक्स पिणे फायद्याचे ठरेल. या डिटॉक्स ड्रिंक्समध्ये लिंबू-पुदिना, काकडी-लिंबू, टरबूज-तुळशीचे पाणी हे प्रभावी पर्याय आहेत. या पाण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत मिळेल, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसेल. आज आपण जाणून घेऊयात काही डिटॉक्स ड्रिंक्स, जे प्यायल्याने त्वचेच्या अनेक तक्रारी कमी होतील.

लिंबू- पुदिना पाणी –

  • लिंबू -पुदिन्याचे डिटॉक्स पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू आणि पुदिन्याच्या पानांचा रस मिक्स करून घ्या.
  • या डिटॉक्स ड्रिंकमुळे पचन सुधारते आणि त्वचेला ताजेतवाने करते.

टरबूज-तुळशीचे पाणी –

  • टरबूज आणि तुळशीची पाने पाण्यात मिसळून प्या.
  • हे ड्रिंक ऍटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे, ही दोन्ही पोषकतत्वे त्वचेसाठी फायदेशीर आहे.

काकडी-लिंबू पाणी –

  • काकडी आणि लिंबाचे काप एक ग्लासभर पाण्यात टाका.
  • हे ड्रिंक शरीराला थंडावा देते आणि त्वचेला चमकदार बनवते.

आवळा-लिंबू-हळद पाणी –

  • एक ग्लास गरम पाण्यात आवळा पावडर, लिंबू रस आणि थोडी हळद मिक्स करा.
  • या ड्रिंकमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होईल, ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होऊन त्वचेचे आरोग्य सुधारेल.

बीटाचे पाणी –

  • बीटाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, ऍटीऑक्सिडंट्स, लोह आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतात.
  • या डिटॉक्स ड्रिंकमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. ज्यामुळे त्वचेला चमक येते आणि वृद्धत्वाची क्रिया कमी होते.

लिंबू आणि मध –

  • लिंबातील व्हिटॅमिन सी त्वचेला आतून स्वच्छ करते आणि मध त्वचेला मॉइश्चरायज करते.
  • हे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=SFIB96DMKRK

Comments are closed.