साहित्यसेवक वसंत तावडे स्मृति प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा, प्रबोधन गोरेगावतर्फे आयोजन

प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले धडाडीचे शिवसैनिक व संस्थेचे एक आधारस्तंभ म्हणजे दिवंगत वसंत तावडे. शिवसेना, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ‘प्रबोधन गोरेगाव’ या तीन नावांनी झपाटलेला हा कार्यकर्ता. त्यांच्याकडे ‘उत्तम वाचक आणि चांगला लेखक’ हे गुण असल्यामुळे त्यांनी ‘आपले वसंतश्री’ हा दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम अनेक वर्षे यशस्वीपणे चालविला. त्यांच्या असामान्य योगदानाला अभिवादन म्हणून ‘प्रबोधन गोरेगाव’ तर्फे यंदाही साहित्यसेवक वसंत तावडे स्मृति प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेचे माहितीपत्रक गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधन क्रीडा भवन कार्यालयात उपलब्ध असून ते स्पर्धकांना व्हॉट्स अॅपवरून मागविता येईल. पारितोषिक विजेत्या कथा साप्ताहिक ‘मार्मिक’ मध्ये प्रसिद्ध केल्या जातील. प्रथम 15 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 7,500 रुपये आहे. उत्तेजनार्थ आणि द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी 5 हजार रुपयांचे आहे. स्पर्धा सर्व लेखकांसाठी खुली असून स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही. कथा लेखकाने स्वतः लिहिलेली असावी. अधिक माहितीसाठी 7506760676 या क्रमांकावर रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून अन्य दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळात संपर्क साधावा.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारणाच्या विचारांच्या प्रेरणेतून 1972 साली शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी ‘प्रबोधन गोरेगाव’ची स्थापना केली. या संस्थेने जनतेसाठी गोरेगाव येथे ‘प्रबोधन क्रीडा भवन’ हे क्रीडा संकुल, प्रबोधन डायलेसिस सेंटर, माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यासह अभ्यासिका, जॉगर्स पार्क, टेनिस अकादमी, ओझोन जलतरण तलाव, माणगाव येथे व्यवसाय प्रशिक्षण देणारे ‘एमजीएल-प्रबोधन कौशल्य निकेतन’ आणि आता मुंबईतील तरुण आणि तरुणींसाठी ‘प्रबोधन कौशल्य केंद्र’ हे गोविंद दळवी सभागृह, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम) येथे सुरू केले आहे.
Comments are closed.