पंजाबच्या सीमेवर सहा पाकिस्तानी ड्रोनने गोळी झाडली

बीएसएफ जवानांची सतर्कता : हेरॉईनची चार पाकिटेही जप्त

वृत्तसंस्था/ अमृतसर

सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी गुरुवारी रात्री एक उल्लेखनीय कामगिरी करत सीमावर्ती भागात विविध घटनांमध्ये 6 पाकिस्तानी नार्को ड्रोन पाडले. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान शेतात पडलेले हेरॉइनचे 4 पॅकेट देखील जप्त करण्यात आले आहेत. 17 जुलैच्या रात्री कर्तव्यावर तैनात असलेल्या सतर्क जवानांनी पंजाब सीमेवर मोठी ड्रोन घुसखोरी रोखली. जवानांनी जलद प्रतिसाद देत सीमेवर तैनात केलेल्या तांत्रिक यंत्रणांना सक्रिय करत पाकिस्तानकडून येणारा प्रत्येक नार्को ड्रोन निक्रिय केला. यानंतर, बीएसएफ जवानांनी शोधमोहीम राबवत पुलमोरन गावानजिकच्या शेतातून एकूण 6 क्लासिक ड्रोन आणि हेरॉइनची चार पॅकेट जप्त केली.

Comments are closed.