ओय त्वचा: तेल-तापमान हारान तेल बनले? साठी हा सोपा उपाय करा
प्रत्येक प्रकारच्या त्वचेची स्वतःची वेगळी समस्या असते. परंतु, जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेच्या समस्या अधिक त्रासदायक ठरतात. त्यात पावसाळ्यातील वातावरणात आर्द्रता असते. अशा वातावरणात विशेष करून तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना त्वचेच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चेहऱ्यावर मुरुमे, ब्लॅकहेड्स, पिंपल्ससारख्या समस्या उद्भवतात. वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचेचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे त्वचेवर अधिक घाण जमा होऊ लागते. तुम्ही सुद्धा अशा समस्यांनी त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आपण जाणून घेऊयात सोपे उपाय..
मुलतानी माती –
मुलतानी मातीचा फेस पॅक तेलकट त्वचेवर रामबाण उपाय आहे. मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल काढण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. हवे असल्यास मुलतानी मातीची पेस्ट बनवण्यासाठी पाण्याऐवजी गुलाबपाणी वापरू शकता.
गुलाबपाणी –
गुलाबपाणी एक नैसर्गिक टोनर आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचा फ्रेश होते. तसेच गुलाबपाण्याच्या नियमित वापरामुळे पोर्स अधिक घट्ट होतात. पावसाळ्यात तर आवर्जून तुम्ही गुलाबपाणी चेहऱ्यावर लावायला हवे. त्वचा मऊ होण्यासाठी गुलाबपाणी सगळ्यात प्रभावी उपाय आहे.
कडुलिंबाचे फेसपॅक –
कडुलिंब एंटीसेप्टीक आणि एंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करून पिंपल्सची समस्या कमी करतात. यासाठी तुम्ही कडूलिंबाची पानं बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. तयार फेसपॅक तुम्ही तेलकट त्वचेवर लावू शकता.
हेही पाहा –
Comments are closed.