अंतिम टप्प्यात भारत-यूएस टॅरिफ डील

भारतावर कमी कर लादण्याचे ट्रम्प यांच्याकडून संकेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या ‘टॅरिफ’बाबत (व्यापार करार) चर्चा सुरू आहे. भारतीय अधिकारी करारासंबंधीच्या चर्चेसाठी वॉशिंग्टनमध्येच तळ ठोकून आहेत. सद्यस्थितीत अमेरिका भारताला दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांवरील कर कमी करण्यास सांगत आहे, परंतु भारत राष्ट्रीय हितासाठी आपल्या अटींवर ठाम आहे. त्याचवेळी, अमेरिकेने भारतात आपला कर 15 ते 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा, यावरही लक्ष केंद्रीत केले आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित अंतरिम व्यापार करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत स्पष्ट संकेत देताना भारतावर कमी कर लागू होण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित व्यापार कराराअंतर्गत भारताला प्राधान्य कर सुविधा मिळू शकते. भारताला 1 ऑगस्टपासून इतर देशांवर लादल्या जाणाऱ्या मोठ्या परस्पर करापासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. व्हिएतनामसारख्या देशांच्या तुलनेत भारतीय वस्तूंवर कमी कर लागू होण्याची शक्यता आहे. जर व्हिएतनामी वस्तूंवर 20 टक्के कर लावला गेला तर भारतावर कमी कर असेल, अशी अपेक्षा आहे.

Comments are closed.