श्वानसेवक साधू

हिंदू धर्मात सर्व जीवांना भगवान स्वरुप मानण्यात आले आहे. प्रत्येक जीव, मग तो कितीही लहान किंवा कमी महत्वाचा असो, त्यात भगवंताचा निवास असतो, अशी सनातन हिंदू धर्माची वैश्विक शिकवण आहे. त्यामुळे या धर्माचे खऱ्या अर्थाने पालन करणारे साधूपुरुष मानवासह अन्य प्राणीमात्रांच्या योगक्षेमाचाही विचार करतात. त्यांच्यासाठी कार्य करतात. त्यांची सेवाही करण्यात धन्यता मानतात. सध्या अशा एका साधू महाराजांचा व्हिडीओ प्रसारित होत आहे.

भगवा वेष धारण केलेले हे साधू महाराज एका श्वानाची सेवा करताना दिसून येतात. जसे वृद्ध माणसांचे पाय दुखत असतील तर घरातील मुले किंवा तरुण लोक त्यांचे पाय चेपून देतात. त्यामुळे दुखऱ्या पायांना काहीकाळ आराम मिळतो. तशाच प्रकारे हे साधू महाराज या श्वानाचे पाय चेपतात. त्या श्वानालाही हे केल्याने माणसाप्रमाणे बरे वाटताना दिसून येते. जेव्हा साधू पाय चेपणे थांबवतात तेव्हा तो श्वान त्यांना आपल्या नाकाने स्पर्श करुन आणि भुंकून जणू आणखी माझे पाय चेपून द्या, अशी सूचना करताना दिसून येतो. साधू महाराजांकडून आपली सेवा करुन घेण्यात या श्वानालाही धन्यता वाटताना दिसून येते. आपण मानव आहोत. याचा अर्थ आपण इतर जीवमात्रांपेक्षा श्रेष्ठ आहोत. इतर प्राणी आणि जीव आपल्याला उपभोगांसाठीच आहेत, अशी समजून मानवाने कधीही करुन घेऊ नये. या पृथ्वीवर मानवाइतकाच अधिकार या मानवेतर जीवांना आहे. त्यांना त्रास होऊ  नये, याची दक्षता मानवाने घेतली पाहिजे. आपल्याला देवाने दिलेले मानवपण त्याने विनयाने आणि कृतज्ञताभावाने स्वीकारले पाहिजे, हा महत्वाचा संदेश हे साधू महाराज देत आहेत, अशी प्रतिक्रिया एका दर्शकाने व्यक्त केली आहे. असे साधू खरे समाजहितकर्ते आहेत, असेही मत अन्य एकाने व्यक्त केले आहे. हा व्हिडीओही पुष्कळ लोकप्रिय होताना दिसून येत आहे.

Comments are closed.