WCL 2025: पाकिस्तानची विजयी सुरुवात; हफीजची चमकदार कामगिरी, इंग्लंडचा पराभव
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 शुक्रवारपासून म्हणजेच 11 जुलैपासून सुरू झाली आहे. स्पर्धेची सुरुवात यजमान इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याने झाली. WCL 2025 च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामध्ये पाकिस्तानने फक्त 5 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयाचा नायक मोहम्मद हाफीज होता, ज्याने शानदार अर्धशतक झळकावले आणि पाकिस्तानला 160 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडकडून इयान बेलनेही अर्धशतक झळकावले, परंतु तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. हाफिजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीर कामरान अकमल (8) आणि शरजील खान (12) स्वस्तात बाद झाले. यानंतर, कर्णधार मोहम्मद हाफीज फलंदाजीला आला आणि त्याने 34 चेंडूत 8 चौकारांसह 54 धावांची शानदार खेळी केली. शेवटी, आमिर यामीनने फक्त 13 चेंडूत 27 धावा करत पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 160 धावांपर्यंत पोहोचवले.
161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल मस्टर्ड (58) यांनी शानदार अर्धशतक झळकावले आणि इयान बेलनेही 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 51 धावांची नाबाद खेळी केली, परंतु दोन्ही फलंदाजांच्या अर्धशतकांमुळे संघाला काहीच फायदा झाला नाही आणि इंग्लंडला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडला शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती, पण पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर सोहेल खानने पुढच्या 5 चेंडूत फक्त 6 धावा दिल्या. पाकिस्तानचा पुढील सामना 20 जुलै रोजी भारताविरुद्ध आहे.
Comments are closed.