ठाकरे ब्रँड ग्राहकांना अन् जनतेला पसंत नाही, सामनाच्या मुलाखतीवरून सुधीर मुनगंटीवार यांची टीका
सुधीर मुंगतीवार नागपूर : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेणे म्हणजे हि घरघुती मुलाखत आहे, मॅच फिक्सिंग आहे. आदीच प्रश्न ठरलेले असतात, मुलाखतीतुन आपलं कौतुक करून घेण्याचा हा प्रकार आहे. अशा मुलाखती लोकांना आवडत नसतात, अशा या शब्दात भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा समाचार घेतलाय. शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरून सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर ही त्यांनी टीका केली आहे.
वारंवार पराभव, म्हणून अशी कारणे शोधली जातात-सुधीर मुनगंटीवार
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सामनाच्या मुलाखतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ही मुलाखत ‘मॅच फिक्सिंग’ असून, प्रश्न आधीच ठरवलेले होते, असे म्हटले आहे. “सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेलाही पसंत नाही,” असे मुनगंटीवार यांनी म्हटले. मुलाखतीमध्ये केवळ स्वतःचे कौतुक आणि इतरांना शिव्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. अशा मुलाखती लोकांना आवडत नाहीत, असेही त्यांनी यावेळी नमूद केलं. मुलाखतीतून कोणतेही नवीन ज्ञान किंवा महाराष्ट्राच्या प्रगतीचे विचार मिळत नाहीत. शिवाय निवडणूक आयोगाबद्दल केलेल्या एका विधानावरही आक्षेप घेण्यात आलाय. वारंवार पराभव पत्करावा लागत असल्याने अशी कारणे शोधली जात आहेत, असेही या सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
…..तर उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकले असते-सुधीर मुनगंटीवार
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत काही नवीन असतं, वैचारिक ज्ञान असतं, महाराष्ट्राच्या प्रगतीचे बीजारोपण असतं तर आम्ही समजलो असतो. मात्र शिवी देणे म्हणजे मुलाखत असते का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तर वारंवार पराभव होत असल्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत. असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कर्माची फळ मिळत आहे. 2019 महायुतीला विजय मिळाला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी विनंती केली असती तर विचार झाला असता. बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकले, तर उद्धव ठाकरेही होऊ शकले असते. मात्र हे गुजरातला शिवी देण्यात धन्यता मनात आहे. असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यावेळी म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=rxwyehs0lmy
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.