राशिभविष्य – रविवार 20 जुलै 2025 ते शनिवार 26 जुलै 2025
>> नीलिमा प्राचार्य
जाळीदार शब्द जपून वापरा
मेषेच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू युती. संयम, सहनशीलता ठेवल्यास कामे करून घेता येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागली. शब्द जपून वापरा. धंद्यात गिऱहाईक तोडू नका. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर जुन्या विषयासंबंधी आरोप होईल. कडवट शब्द ऐकावे लागतील. शुभ दि. 20, 21
वृषभ – प्रवासात घाई नको
वृषभेच्या धनेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. कोणतेही कठीण, अडचणीत आलेले काम करून द्या. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. किचकट समस्या सोडवाल. धंद्यात वाद नको. गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तीची भेट होईल. ज्ञानात भर पडेल. पद, प्रतिष्ठा, मैत्री वाढेल. शुभ दि. 21, 25
मिथुन – वर्चस्व टिकवा
स्वराशीत शुक्र, चंद्र, बुध लाभयोग. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. व्यसन, मोह नको. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी, तणाव जाणवतील. नोकरीमध्ये नवी संधी मिळेल. धंद्यात भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. उतावळेपणा नको. चांगल्या संधीची वाट पहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या शेवटी महत्त्वाची बातमी मिळेल. शुभ दि. 25, 26
कर्करोग फसगत टाळा
कर्केच्या व्ययेषात शुक्र, सूर्य शनि त्रिकोणयोग. कोणताही वाद, तणाव, गैरसमज सप्ताहाच्या सुरुवातीला मिटवा. नोकरीमध्ये स्पर्धा करणारे वाढतील. वर्चस्व टिकवा. धंद्यात नम्रता ठेवा. फसगत टाळा. नवीन परिचयावर भाळून जाऊ नका. वैवाहिक जीवनात तणाव दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनाठायी खर्च होईल. प्रतिष्ठा राहील. शुभ दि. 25, 26
सिंह – समस्या जटिल होणार नाही
सिंहेच्या एकादशात शुक्र, चंद्र गुरू युती. सहनशीलता, नम्रता ठेवा म्हणजे समस्या जटील होणार नाही. विरोधक चौफेर गुप्त कारवाया करतील. नोकरी टिकवा. कामात चूक होईल. सावध रहा. धंद्यात कराराची घाई नको. कोणालाही कमी लेखू नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. अपमानास्पद घटना घडेल. शुभ दि. 20, 21
कन्या कामाची प्रशंसा होईल
कन्येच्या दशमेषात शुक्र, सूर्य हर्षल लाभयोग. रागावर ताबा ठेवल्यास कोणतेही काम सहजपणे पूर्ण करू शकाल. दौर्यात वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात जम बसवा. किचकट काम रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचा सहवास लाभेल. लोकांच्या हितासाठी नवे काम करा. शुभ दि. 21, 22
तूळ – महत्त्वाचा बदल घडेल
तुळेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. टीकाकारांना कमी न लेखता स्वतच्या वागण्यात बदल करा. तुमचा प्रभाव वाढतच राहील. नोकरीत महत्त्वाचा बदल घडेल. धंद्यात जम बसवा. नवीन ओळखी नीट पारखून करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ आश्वासन देतील. लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. 25, 26
वृश्चिक – बुद्धिचातुर्य वापरा
वृश्चिकेच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य शनि त्रिकोणयोग. अचानक एखादी समस्या कमी होऊ शकते. नोकरीत बुद्धिचातुर्य वापरा. परदेशी जाण्याचा योग येईल. धंद्यात वाढ होईल. सावध भूमिका घ्या. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमच्यवर सडकून टीका करतील. खाण्याची काळजी घ्या. शुभ दि. 20, 21
धनु – प्रकृतीची काळजी घ्या
धनुच्या सप्तमेषात शुक्र, चंद्र गुरू युती. अडचणी, अडथहे पार करून यश खेचावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज, ताणतणाव यामुळे मनस्वास्थ्य बिघडेल. नोकरीमध्ये मनाविरुद्ध काम करावे लागेल. कोणत्याही व्यवहारात काळजी घ्या. धंद्यात नम्रता बाळगा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर अस्थिरता जाणवेल. शुभ दि. 22, 23
मकर मोठा निर्णय घेऊ नका
मकरेच्या षष्ठेशात शुक्र, सूर्य हर्षल लाभयोग. अनेकांना तुमच्या सहकार्याची गरज भासेल. तुम्ही तारतम्य ठेवून वागा व निर्णय घ्या. मोठे आश्वासन देण्याने अडचणी येऊ शकतील. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात तात्पुरत्या लाभाचा विचार करा. मोठा निर्णय नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांशी चर्चा कराल. विरोधक तुमच्याशी मैत्रीची भाषा करतील. शुभ दि. 20, 21
कुंभ – अहंकार दूर ठेवा
कुंभेच्या पंचमेषात शुक्र, चुद्र मंगळ लाभयोग. निश्चित निर्णय घेण्याची घाई नको. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत व्याप, तणाव राहील. धंद्यात हिशेब तपासा. अहंकाराने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे मांडण्याचा उत्साह दाखवू नका. तडजोड, तटस्थ धोरण स्वीकारा. कायदा मोडू नका. शुभ दि. 22, 23
मीन – नवे कंत्राट मिळेल
मीनेच्या सुखेषात शुक्र, सूर्य हर्षल लाभयोग. महत्त्वाची कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. अनेकांना मदत करावी लागेल. धंद्यात वाढ, वसुली करा. चर्चेत यश मिळेल. नवे कंत्राट मिळवता येईल. नोकरीमधे मोठे काम स्वीकारावे लागेल. तुमच्या परीक्षेचा कालावधी असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ पद, प्रतिष्ठा देतील. शुभ दि. 20, 21
Comments are closed.