आरेवारे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

आरेवारे समुद्रात चौघेजण बुडून मृत्यू पावल्याची घटना आज सायंकाळी घडली. मुंब्रा येथून पाहुण्या आलेल्या दोघी आणि स्थानिक दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मुंब्रा येथून उज्मा शामशुद्दीन शेख (18), उमेरा शामशुद्दीन शेख (29) या रत्नागिरीत आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या दोघी जैनब जुनैद काझी (26), जुनैद बशीर काझी (30) यांच्यासोबत सायंकाळी आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला होता. उसळी घेणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही. अचानक उसळलेल्या महाकाय लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले. ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले.

Comments are closed.