एटीएममध्ये 100, 200 रुपयांच्या नोटा वाढवा; आरबीआयचे सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना निर्देश

एटीएममध्ये केवळ 500 रुपयांच्या नोटा मिळत असल्याने अनेक ग्राहक नाराज आहेत. त्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळत नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना एटीएममध्ये पुरेशा 100 आणि 200 रुपयांच्या नोटा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
आरबीआयने एक पत्रक जारी केले असून यात म्हटले आहे की, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरात 75 टक्के एटीएम असे असायला हवेत ज्यामध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळायला हव्यात. तसेच 31 मार्च 2026 पर्यंत ही संख्या 90 टक्क्यांपर्यंत वाढवायला हवी. 500 रुपयांच्या तुलनेत 100 आणि 200 रुपयांच्या नोटा व्यवहारांसाठी उपयोगी पडतात. परंतु, एटीएममधून पैसे काढताना केवळ 500 रुपयांच्या नोटा येत आहेत. त्यामुळे आरबीआयने बँका आणि एटीएम ऑपरेटर्सना या नोटा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील प्रमुख शहरात प्रत्येक ग्राहकाला एका महिन्यात 3 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळतील. तर अन्य शहरात ही संख्या पाच आहे.
Comments are closed.