'राजा' च्या गोळीबारात शाहरुख खान जखमी झाला

अमेरिकेत शस्त्रक्रिया : एक महिना विश्रांतीचा सल्ला

वृत्तसंस्था/ मुंबई

‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाला आहे. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना त्याला दुखापत झाली. सध्या शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला गेला आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही वृत्त असून डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

‘किंग’ चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह त्याची मुलगी सुहाना खान, तसेच दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर सारखे कलाकार दिसतील. आता ‘किंग’चे चित्रीकरण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये शाहरुख पूर्णपणे बरा झाल्यावर सुरू होईल. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको आणि वायआरएफ स्टुडिओमध्ये जुलै ते ऑगस्टदरम्यान चित्रपटाचे शूटिंग वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. ‘किंग’चे शूटिंग भारत आणि युरोपमध्ये होणार आहे.

Comments are closed.