फडणवीसांचं मंत्रिमंडळ म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
हर्षवर्डन सपकल: राज्यात 2022 मध्ये जे सत्तांतर घडलंय ते समृद्धी महामार्गातून वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करून 50-50 खोके तयार करण्यात आले. तसेच हनी ट्रॅप घडवण्यात आला आणि यातून हे सत्तांतर घडल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. फडणवीस सरकार आणि फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ नसून “काळूबाळू चा तमाशा” आहे. अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मंत्रिमंडळात सर्व गुंड मवाली आहेत आणि फडणवीस यांना नैतिकता असलेले लोकप्रतिनिधी नको आहेत. त्यांना फक्त गुंड मवालीच हवे आहेत. कारण नैतिकताच काही शिल्लक राहिलेली नाही. हे सरकार नसून धोंडू कोंडूचा तमाशा असल्याची टीका ही त्यांनी केली आहे.
राक्षसी बहुमतामुळे या सरकारने कुणालाही बोलू दिले नाही- हर्षवर्धन सपकाळ
नुकतच राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलं . या अधिवेशनात राज्याने काय कमावलं आणि काय गमावलं? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केला असता ते म्हणाले की, यात गमावलच गमावलं आहे, काहीही कमावलं नाही. तर कमावलं काय गुंड आणि मवाली. तर या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी डब्ल्यूडब्ल्यूएफचा आखाडा सुरू केला, हे सिद्ध केलं. जन सुरक्षा विधेयकाला पाहिजे तसा विरोध केला नाही म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांना हाय कमांडने नोटीस पाठवली आहे. हे खरं आहे? असे विचारले असता ते म्हणाले की, राक्षसी बहुमतामुळे या सरकारने कुणालाही बोलू दिले नाही. सरकारने अनेक काळे कायदे मंजूर करून घेतले.
विधानसभा अध्यक्ष हे हेकेखोर आहेत. ते हुकूमशहांचे प्रतिनिधी- हर्षवर्धन सपकाळ
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनाच संयुक्त समितीत घेतलं आणि त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना सभागृहात बोलता आलं नाही किंवा विरोध करता आला नाही. असे बोलले जात आहे. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उद्या ते बजरंग दलालाही संयुक्त समितीत घेतील. राक्षसी बहुमतामुळे त्यांनी बुलडोझर चालवलं. विधानसभा अध्यक्ष हे हेकेखोर आहेत. ते हुकूमशहांचे प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही विधेयकावर चर्चा होऊ दिली नाही. असा आरोप ही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केला.
हनीट्रॅपच्या माध्यमातून यांनी सत्तांतर, सर्व पुरावे काँग्रेसकडेही आणि सार्वजनिकही आहेत
समृद्धी महामार्गात खूप मोठा भ्रष्टाचार झाला. जवळपास 20 हजार कोटींचा आणि त्यामुळे या भ्रष्टाचाराचा पैसा आणि हनीट्रॅपच्या माध्यमातून यांनी सत्तांतर घडवून आणलं आणि शिंदे मुख्यमंत्री झालेत. याचे सर्व पुरावे काँग्रेसकडेही आहेत आणि सार्वजनिकही आहेत. समृद्धी महामार्गतील भ्रष्टाचार पैसा हा 50 खोक्यांसाठी वापरण्यात आला. अनेक अधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी यात अडकविण्यात आलं आणि सत्तातर घडलं. मी ठाणेकर म्हणून मिरवणाऱ्या नेत्याने यात हस्तक्षेप केलेला आहे. मी तेच म्हणतोय, वीस हजार कोटी रुपये हे समृद्धी महामार्गातील जनतेचे पैसे व हे पैसे हानीट्रॅपसाठी वापरून या सर्व गोष्टी घडवून आणले आहेत. याचे सर्व पुरावे काँग्रेसकडे आहेत, सार्वजनिकही आहेत. हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या सर्व अधिकारी व नेत्यांच्या मोबाईलमध्ये हे पुरावे आहेत, काँग्रेसकडे आहेत. ट्रकचे ट्रक भरून पुरावे आहेत, पण सरकारला हे प्रकरण वर येऊ द्यायचं नाही. त्यामुळे अशा वेळेस हे पुरावे द्यायचे कुणाकडे हा प्रश्न आहे. असेही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.