जंगली रमी पे आओ ना महाराज! राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अन् कृषीमंत्री रमी खेळण्यात व्
मॅनक्राव कोकेटे वर रोहित पवार: एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठींना विचारू, असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केले होते. यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
“#Jungle_rimi_pa_ao_na_na_maharaj…! ”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7tatq
– रोहित पवार (@rrpspeaks) 20 जुलै, 2025
कधी शेतीवर या महाराज
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता यावर माणिकराव कोकाटे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.