Uddhav Thackeray on Raj Thackeray : ‘आम्ही एकत्र आल्यानं कुणाला प्रॉब्लेम आहे का?’

सामनाच्या महामुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राज ठाकरे आपल्याला फोन करू शकतात आणि आपण आता भेटू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ‘आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांनी त्यांच्या पोटदुख्या सांभाळाव्यात, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आम्ही एकत्र आल्याने इतर भाषिकांनाही आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. एकत्र येण्यातील सकारात्मक बाजूही आपण पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Comments are closed.