सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात द

गुन्हे ठेवा: पुण्यातून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामाऱ्या, कोयत्याची दहशत,घरफोडी अशा अनेक घटना समोर येत असताना पिंपरी चिंचवड मधून सशस्त्र दरोड्याचा थरार समोर आलाय. पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरी चार-पाच दरोडेखोरांनी व्यावसायिकाचे हातपाय बांधून दरोडा टाकला .रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . दरोडेखोरांनी घरातील रोकड रकमेसह लाखोंचा किमती ऐवज लंपास केला आहे .

चंद्रभान छोटूराम अग्रवाल असं बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे .निगडी प्राधिकरण परिसरात ते राहतात .घटनेच्या वेळी रात्री ते घरात एकटेच होते .हॉलमध्ये बसले असताना बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा होता .अचानक चार-पाच सशस्त्र दरोडेखोर घरात घुसले .दरोडेखोरांनी नोकरचा चाकरांसह व्यवसायिक अग्रवाल यांनाही हातापायाला बांधून खोलीत डांबले . रात्री नऊच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडला .

नेमकं घडलं काय?

प्रत्यक्षदर्शिनी दिलेला माहितीनुसार,पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार-पाच दरोडेखोर शिरले .दरोडेखोरांनी आधी नोकरांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले .बांधकाम व्यवसायिक चंद्रभान यांचेही हातपाय बांधून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले होते .हा सगळा प्रकार सुरू असताना व्यवसायिक चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवत गॅलरीत येऊन आरडा ओरड केली .मदतीसाठी आसपासच्या लोकांना हाका मारल्या .त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे .दरम्यान हात बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी हाका मारणाऱ्या व्यवसायिकाचा व्हिडिओ ही समोर आला आहे . जीवाचा आकांताने मदतीसाठी हाका मारणाऱ्या व्यावसायिकाला बघून अनेक लोक त्याच्या मदतीसाठी धावून गेले .दरोडेखोर हत्यार बंद असल्याचे कळल्याने आत मध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही .त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली .माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले .मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते . रात्री उशिरापर्यंत बांधकाम व्यवसायिकाच्या बंगल्यासमोर पोलिसांचा ताफा उभा होता .अनेक नागरिकांची गर्दी देखील होती . पोलीसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास  सुरू केला आहे .या घटनेत किती रक्कम चोरीला गेली ?सोनं नाणं केलंय का ?दरोडा नेमका कसा पडला ?याचा तपास सुरू आहे .दरम्यान पोलीस अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

हेही वाचा

Chhattisgarh Naxal: छत्तीसगडच्या अबूजमाडच्या जंगलात 46 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सहा माओवाद्यांना कंठस्नान; मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश

आणखी वाचा

Comments are closed.