कधी आमदार चड्डी-बनियनवर, एक मंत्री बॅगेतील करोडो रुपये मोजतो; आता हद्द झाली, कोकाटेंचा रमी खेळत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. यात सभागृहात बसून माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी सर्कलवर गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा विरोधकांनी कोकाटेंसह सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्याची अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे. कधी एखादा सत्ताधारी आमदार चड्डीवरती आणि बनियान वरती खाली उतरतो, कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो, कधी विधिमंडळाच्या प्रांगणात अगदी भांडण लोकप्रतिनिधी यांच्याकडून होतात, कधी एखादा मंत्री करोडो रुपये बॅगमधले मोजतानाचा व्हिडिओ पब्लिश होतो आणि आता तर हद्द झाली. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषिमंत्री दिसतात. मुळात सभागृहाचे अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असं माध्यमांकडून कळतंय हा पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा खिशातला पैसा आहे. लोकांनी घरपट्टी, पाणीपट्टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले, त्या कराचा हा पैसा आहे. ज्या पैशात जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा होईल असे आम्हाला वाटते. मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाइन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे, अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची आणि शिंदेंची किंवा देवेंद्र फडणवीस यांची त्यांना अशा लोकांना उमेदवारी द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा प्रकारचे मंत्रीपदावर वर्णी लावावी लागते, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांची काय आहे पोस्ट?
रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
“#Jungle_rimi_pa_ao_na_na_maharaj…! ”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7tatq
– रोहित पवार (@rrpspeaks) 20 जुलै, 2025
कधी शेतीवर या महाराज
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता यावर माणिकराव कोकाटे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=jjolzxwtojo
आणखी वाचा
Comments are closed.