कृषीमंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळताना दिसले; प्रताप सरनाईक म्हणाले, आमिर-शाहरुखही खेळतात!

मनक्राव कोकेटे वर प्रताप सरनाईक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसून येत आहे. माणिकराव कोकाटेंच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी माणिकराव कोकाटेंचं एकप्रकारे समर्थनचं केलं आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समर्थन केलं आहे. अभिनेता आमिर खान, सलमान खान सध्या सगळेच रमी खेळतात. टीव्हीवर दाखवलं जातं, असं प्रताप सरनाईक म्हणाले. विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटे यांचा समर्थन केल्याची चर्चा आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का?, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं- संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं आहे. त्यात त्यांचे देखील नाव आहे. अमित शाह यांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही नावं आहेत, त्यात संबंधित कृषीमंत्र्यांचे नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

मॅनक्राव कोकेटे जेव्हा नियम राम, व्हिडिओ:

https://www.youtube.com/watch?v=d9uoznffg4o

संबंधित बातमी:

Sanjay Raut : अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव; संजय राऊतांचा मोठा दावा

आणखी वाचा

Comments are closed.