एव्हरेस्ट शिखरावरचा साहसी प्रवास, Whats Your Everest पुस्तकाचे प्रकाशन
एव्हरेस्टवर जाऊन आपली पताका फडकावी असे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असतं. पण हे स्वप्न सोपं नाही. या नादात अनेकांनी इहलोकाची यात्राही घडते. पण हा प्रवास कसा होता याचे अनुभवर पुस्तक प्रकाशित झाले आहे. समीर पथम आणि सौरज झिंगान या दोन ध्येयवेड्यांनी What Your Everest या पुस्तकात आपला अनुभव मांडला आबे. ब्लुम्सबेरी प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहेय.
बहुतेक लोकांना एव्हरेस्ट म्हटलं की फक्त शिखर दिसतं. पण समीर पाथम आणि सौराज झिंगनसाठी हे शिखर म्हणजे बरंच काही होतं, अपयश, जीवावर बेतलेल्या घटना, आणि तरीही पुन्हा उभं राहण्याचा हट्ट. What’s Your Everest हे पुस्तक म्हणजे फक्त पर्वतारोहणाचं वर्णन नाही; तर आपण सगळे आपल्या आयुष्यात ज्या अदृश्य शिखरांसाठी झगडतो त्या भीती, अपयश, अनिश्चितता आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याच्या गोष्टी या पुस्तकात आहेत.
२०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन झालं होतं. यात १७ लोक दगावले. सुदैवाने यात समीर आणि सौरज वाचले. आपले प्राण वाचल्यानंतर दोघेही इतरांच्या मदतीसाठी धावले. लोकांना अन्न, मदत आणि औषधं पुरवली. नेतृत्व शिखरावर पोहोचून सिद्ध होत नाही, तर अशा क्षणीच खरं दिसतं ही बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतरच्या चढायांमध्ये ते एव्हरेस्टपासून अवघ्या 900 मीटरवर पोहोचून परत फिरले. आणि त्या क्षणानंतरही त्यांनी हार मानली नाही.
सौराज म्हणतो आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी एक स्वप्न उराशी बाळगलेलं असतं. त्यासाठी खूप काही गमावलेलंही असतं. पण काही वेळा ते स्वप्न अर्धवट सोडून परत यावं लागतं आणि खरं एव्हरेस्ट तिथंच असतो. पुन्हा उभं राहून प्रयत्न करणं खरी गोष्ट तिथूनच सुरु होते.”
समीर म्हणतो की हे पुस्तक फक्त पर्वतांबद्दल नाही. हे त्या अनुभवांबद्दल आहे जे पर्वताच्या पलीकडे आहेत -नेतृत्व, अहंकार, नम्रता, भीती, आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद.”
मान्यवरांनीही या पुस्तकाला दाद दिली आहे. हे पुस्तक तुम्हाला विचार करायला भाग पाडेल, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी दिली आहे. तर स्वप्नं सोडू नका. पुन्हा उभं राहा. याचं हे जबरदस्त उदाहरण असे अभिनेते अनुपम खेर म्हणाले.
समीर पाथम आणि सौराज झिंगन हे अॅडव्हेंचर पल्स चे संस्थापक आहेत. त्यांनी हजारो लोकांना, लहान मुलांपासून, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, कॅन्सरवर मात केलेल्यांपासून कॉर्पेरिट टीम्सपर्यंत, त्यांचं ‘एव्हरेस्ट’ गाठायला मदत केली. पर्वत चढणं फक्त उंचीचं नसतं; ते आपल्या आतल्या प्रवासाचं असतं असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
Comments are closed.