भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; धक्कादायक माहिती स

भिवंडी गुन्हेगारीच्या बातम्या: अनेक झोपडपट्टी विभागातील किराणा दुकानासह हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे पाव आणि ब्रेडला लावले जाणारे तसेच खाद्यपदार्थात वापरले जाणारे अमूल बटर खरंच चांगल्या प्रतीचे आहे की बनावट असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला नक्कीच पडेल. कारण चवीने खाण्यात येणारे अमूल बटर (Amul Butter) हे बनावट असू शकते. त्याचे कारण म्हणजे भिवंडी शहरात अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने गुरुवार 17 जुलै रोजी एका की अमूल बटरचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले असता तेथे या बनावट अमूल बटर कारखान्याचा भांडाफोड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरामध्ये बनावट अमोल बटरचे उत्पादन चालू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी करणे यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसां सह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड, कासिमपुरा या ठिकाणी एका कारखान्यावर गुरुवारी 17 जुलै रोजी गोदामामध्ये दुपारी अचानक धाड टाकली. त्याठिकाणी अमूल कंपनीचे 100 ग्रॅम तसेच 500 ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले.

अन्न व औषध प्रशासनाला त्या ठिकाणी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम हे दोघे रिफाईंड पामोलिन तेल, रिफाईंड वनस्पती तेल, मीठ, तसेच बटर फ्लेवर टाकून हँड मिक्सर मशीनच्या सहाय्याने बनावट बटर तयार करीत असल्याचे आढळले. अन्नसुरक्षा अधिकारी करणे यांनी तेथील साहित्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन, त्याठिकाण हून एकूण 180 पाकिटे सह रिफाइंड पामुलीन तेलाचा 73.4 किलो तसेच वनस्पती तेलाचा 73.4 किलो साठा जप्त केलेला आहे. तसेच बनावट लेबलचे रिकामे पाकिटे,रिकामे कार्टून बॉक्स असा एकूण रुपये 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बनावट बटर तयार करण्याचे काम करणारे दोन्ही आरोपी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम यांना ताब्यात घेत त्यांच्यासह त्यांना मदत करणारे इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्नसुरक्षा व मानके कायदा कलमान्वये शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

ही बातमीही वाचा:

Beed Crime News: प्रेयसीने घरी बोलावले, अचानक तिचे नातेवाईक आले; तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना

आणखी वाचा

Comments are closed.