एक्का, दुर्री, तिर्री अन् हा बघा जोकर! माणिकराव कोकाटेंच्या ‘रमी’ व्हिडीओवरून रोहिणी खडसेंचा हल

मॅनक्राव कोकेटे वर रोहिणी खडसे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत. राज्यात भाजपाच्या सरकारखाली काहीच काम उरलेले नाही, म्हणूनच कृषी मंत्री पत्ते खेळण्यात व्यस्त आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, एक्का, दुर्री, तिर्री आणि हा बघा जोकर… शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळत आहेत. मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषीमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार होतोय. ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अर्वाच्य भाषेत बोलतात. पण शेतकऱ्यांबाबत एकही काम करत नाही, असे म्हणत त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

रोहित पवारांची माणिकराव कोकाटेंवर टीका

दरम्यान, रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची   “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=x1pskvpd5xo

आणखी वाचा

Vijay Wadettiwar on Manikrao Kokate : भाजपवाल्यांनी माणिकराव कोकाटेंना केवळ नावालाच मंत्री केलंय, त्यांना कामच उरलेलं नाही; कृषीमंत्र्यांच्या ‘रमी’ व्हिडीओवरून काँग्रेस नेत्याचा घणाघात

आणखी वाचा

Comments are closed.