2007 ची आठवण ताजी! बॉल आऊटमध्ये साउथ आफ्रिकेने वेस्ट इंडीजला झुकवलं
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेत शनिवारी झालेला दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध वेस्ट इंडीज चॅम्पियन्स यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. पावसामुळे 11-11 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली. सामना टाय झाल्यानंतर ‘बॉल आऊट’मध्ये निकाल लागला ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली.
दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजने 11 षटकांत 5 बाद 79 धावा केल्या. लेन्डल सिमन्सने 28 व चाडविक वाल्टनने 27 धावांची उपयुक्त खेळी खेळली. मात्र, कर्णधार ख्रिस गेल (2), पोलार्ड (0) आणि ब्रावो (8) यांची कामगिरी निराशाजनक ठरली.
डकवर्थ-लुईस नियमानुसार साउथ आफ्रिकेला 81 धावांचे लक्ष्य मिळाले. सारेल इरवी (27) आणि जेपी ड्युमिनी (25*) यांनी संघाला मजबूत स्थितीत नेले. हाशिम आमलानेही 15 धावांचे योगदान दिले. अंतिम षटकात विजयासाठी 9 धावांची गरज असताना, संघाने फक्त 8 धावा केल्या आणि सामना टाय झाला.
मात्र यानंतर क्रिकेट इतिहासातील एक दुर्मिळ प्रसंग घडला. 2007 नंतर प्रथमच बॉल आऊट पद्धतीने निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या तीन प्रयत्नांत अपयश आलं, पण जेजे स्मट्स आणि वेन पार्नेल यांनी सलग दोन हिट्स करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
वाटी-आउट निर्णय एसए वि डब्ल्यूआय थ्रिलर 🍿
आपण हे नाटक लिहू शकत नाही! सामना टायमध्ये संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने विंडीज चॅम्पियन्सला तणावपूर्ण वाडग्यात 2-0 ने बाहेर काढले 🎯#डब्ल्यूसीएल 2025 pic.twitter.com/lemlx9r0ac
– फॅनकोड (@फॅनकोड) 19 जुलै, 2025
वेस्ट इंडीजकडून फिडेल एडवर्ड्स, शेल्डन कॉटरेल, एश्ले नर्स आणि ड्वेन ब्रावो यांनी स्टंप्सला हिट करण्यात अपयश पत्करलं. त्यामुळे साउथ आफ्रिकेने सामना जिंकला आणि दोन गुण पटकावले.
बॉल आऊट म्हणजे काय?
सामना टाय झाल्यास प्रत्येक संघाकडून 5 गोलंदाज स्टंप्सवर बिनबल्लेवाल्याला चेंडू टाकतात. ज्या संघाचे अधिक गोलंदाज स्टंप्सला हिट करतात, तो संघ विजेता ठरतो. 2007 च्या टी20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानला बॉल आऊटमध्ये हरवले होते. त्यानंतर आता 18 वर्षांनी प्रथमच बॉल आऊटची पुनरावृत्ती झाली.
Comments are closed.