‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं अजब उत्तर; म्हणाले, युट्युबच

मणक्राव कोकेटे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषीमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केलाय. आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अजब उत्तर दिले आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले की, वरच्या सभागृहात कामकाज तहुकुब झाल्याने मी तिथे बसलो होतो. खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला. मोबाईल ओपन करून युट्युबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात. त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या जाहिराती स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी 18 सेकंदाचाच व्हिडिओ दाखवला आहे. त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवलाच नाही. ते कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे. कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे. कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर, माझ्या कामावर आणि मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कुठलाही विरोधी पक्ष नेता बोलत नाही. माझं काम पारदर्शी आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. कुठल्याही प्रकारे सभागृहात बसू नये, असे नियम मला माहिती आहेत.

युट्युबची जाहिरात स्किप करताना…

तेथे कॅमेरे चालू असतात. मी कशाला गेम खेळत बसू? गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही. स्किप करण्यासाठी मी प्रयत्न केला. माझ्या लक्षात आले नाही की पटकन स्किप कसे करतात. पण स्किप झालेला व्हिडिओ तुम्ही दाखवलेलाच नाही. तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ बघा. मी स्किप केलेलं आहे का नाही? हे तुमच्या लक्षात येईल. ज्याने व्हिडिओ काढला त्याबाबत काहीही दुमत नाही. परंतु, खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे ते युट्युबवर बघण्यासाठी मी मोबाईल हातात घेतला होता. त्यावर डाऊनलोड झालेला गेम मी स्किप करत होतो. स्किप करताना तिथे कोणीतरी व्हिडिओ काढला असेल, असं त्यांनी म्हटले आहे.

बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न

माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, आतापर्यंत रोहित पवारांचे माझ्या संदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांसंदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का? आम्हाला नाही का? आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरण तयार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत नाही. हे रिकामे उद्योग कसे दिसतात? उगीचच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना जनता बळी पडणार नाही, असे टीका त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=hrdxn54iyd0

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.