शिवसेनेच्या रणरागिणीचा नराधमाला चोप, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुळशी तालुक्यातील घटना

एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला शिवसैनिकांनी रुग्णालयात जाऊन चोप दिला. या घटनेतील आरोपीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या संपर्क संघटक स्वाती ढमाले व जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर यांनी चोप दिला आहे.
मुळशी तालुक्यातील वळणे गावातील एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर गावातील शंकर साबळे याने अत्याचार केला. साबळे हा रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे स्वाती ढमाले आणि सागर काटकर यांनी थेट रुग्णालयात जाऊन साबळे याला जाब विचारत त्याला चोप दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.