आर. अश्विनबद्दल मी जळतो का? वादग्रस्त प्रश्नावर हरभजन सिंगने अखेर मौन सोडलं
आर अश्विन आणि हरभजन सिंग. टीम इंडियाचे दोन माजी अनुभवी फिरकी गोलंदाज. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोघांनीही भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये संस्मरणीय विजय मिळवून दिले. अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 537 बळी घेतले, तर भज्जीने 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 बळी घेतले. तथापि, जेव्हा अश्विनने हरभजन सिंगला मागे सोडले तेव्हा दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या अफवा पसरल्या. जेव्हा हा प्रश्न हरभजनला विचारण्यात आला तेव्हा त्याने स्पष्ट आणि अचूक उत्तर दिले.
शो दरम्यान अश्विन अँकरची भूमिका करत असताना त्याने भज्जी वरती नाराज असल्याबद्दल विचारले. याला उत्तर देताना माजी फिरकीपटू म्हणाला, “तुम्हाला वाटतं का मी तुमचावती जळतो?आज आपण सोबत बसलोय आणि गप्पा मारतोय. आता तुम्हाला वाटतं का मी असा माणूस असेल ते? ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केली.
Comments are closed.