WTC फायनल भारतात होणार नाही, आयसीसीचा मोठा निर्णय, BCCI च्या प्लॅनला झटका
अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) जाहीर केलं आहे की, पुढील तीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल सामने इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत झालेली तीनही फायनल्स इंग्लंडमध्येच पार पडली असून, आता 2027, 2029 आणि 2031 मधील फायनल सामन्यांचं आयोजन देखील इंग्लंडच्या मैदानांवर होणार आहे.
आयसीसी (ICC) ने अधिकृत निवेदनात सांगितलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे मागील तीन यशस्वी आयोजन पाहता, 2027, 2029 आणि 2031 या वर्षी होणाऱ्या फायनल्ससाठी यजमानपद इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) देण्यात येत आहे.
2021 साली झालेला फायनल इंग्लंडच्या रोज बाउल स्टेडियमवर खेळवलं गेला होता, जिथे न्यूझीलंडने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये द ओव्हल मैदानावर फायनल पार पडली होती आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. याच मालिकेत 2025 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सनी विजय मिळवला होता.
Comments are closed.