आधी विश्वास संपादन केला, मग घरी बोलावत पायलटकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार

एका खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या पायलटनेच सहकारी एअर होस्टेसवर बलात्कार केल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात पायलटविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पायलट सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडिता आणि आरोपी एकाच एअरलाईन कंपनीत काम करत होते. काही दिवसांपूर्वी लंडनला जाणाऱ्या विमानत दोघांची ओळख झाली. यावेळी दोघेही एकाच परिसरात राहत असल्याचे त्यांना समजले. मग दोघे मीरा रोडपर्यंत एकत्र प्रवास करू लागले. यादरम्यान आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन केला.

आरोपीने पीडितेला त्याचा घरी येण्याचा आग्रह केला. त्याच्या आग्रहाखातर एअर होस्टेस तरुणी पायलटच्या घरी पोहचली असता घरी कुणीही नव्हते. एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर पीडितेने नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे.

Comments are closed.