आयपीएलनंतर विराट कोहलीच्या टीमने आणखी एका ट्राॅफीवर कोरले नाव! राफेल नदालचा संघही पडला मागे
विराट कोहलीची टीम ब्लू राइजिंग: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु अर्थात आरसीबी संघाने नुकतीच 18 वर्षांनंतर आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यांनी फायनल सामन्यात पंजाब किंग्जला धूळ चारत ट्राॅफीवर आपले नाव कोरले होते. एक खेळाडू म्हणून विराट कोहलीची ही पहिली आयपीएल ट्रॉफी होती. आता काही काळानंतर कोहलीच्या संघाने आणखी एक मोठे विजेतेपद जिंकले आहे. मात्र, यावेळी त्याने हे विजेतेपद क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर संघाचा मालक म्हणून जिंकले आहे. (Virat Kohli Team Blue Rising)
विराट कोहली टीम ब्लू राइजिंगचा सह-मालक आहे. भारतीय क्रिकेटपटूची या टीममध्ये आदी के मिश्रा यांच्यासोबत भागीदारी आहे. त्यांच्या या टीमने मोनॅकोमध्ये E1 सीरिजचे विजेतेपद पटकावले. ब्लू राइजिंगने लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी, मार्क ॲंथनी, डिडिएर ड्रोग्बा, राफेल नदाल आणि मार्सेल क्लेअर यांसारख्या दिग्गजांच्या मालकी हक्काच्या संघांना पराभूत करून आपले पहिले विजेतेपद जिंकले. (E1 World Championship title)
PIF द्वारे सादर केलेली जगातील पहिली ऑल-इलेक्ट्रिक रेसबोट सीरिज, UIM E1 वर्ल्ड चॅम्पियनशिप खूपच रोमांचक होती. या रेसमध्ये टीम ब्लू राइजिंगने पहिले स्थान पटकावत विजय मिळवला. दुसऱ्या स्थानावर टीम ब्रॅडी आणि तिसऱ्या स्थानावर क्लेअर ग्रुपची टीम ब्राझील होती, ज्यांना कडवी टक्कर देत विराट कोहलीच्या टीमने बाजी मारली. (Virat Kohli owner)
E1 चे सीईओ आणि फाउंडर रोडी बासो यांनी या विजयाबद्दल विराट कोहली आणि त्याच्या टीमचे अभिनंदन केले. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले, “विराट, आदी, जॉन, सारा आणि संपूर्ण टीमचे त्यांच्या पहिल्या E1 विजयासाठी अभिनंदन. मोनॅकोमध्ये झालेली रेसिंग E1 च्या आतापर्यंतच्या सर्वात शानदार रेसिंगपैकी एक राहिली आहे. या रेसमध्ये देशाची गौरवशाली मोटरस्पोर्ट वारसा दिसतो, ज्यात प्रत्येक वळणावर रोमांच आणि धोकादायक वातावरण होते. आमच्या टीम मालकांसोबत आणि यॉट क्लब डी मोनॅकोसोबत मिळून, आम्ही देशात एक वारसा निर्माण करत आहोत. पाण्यावरील रेसिंगला नवीन परिभाषा देत आहोत आणि क्रीडा जगतात एक नवीन उदाहरण घालून देत आहोत.” (E1 CEO congratulations)
Comments are closed.