2027 वनडे विश्वचषक खेळतील का विराट आणि रोहित? 'या' दिग्गज क्रिकेटरचे धक्कादायक उत्तर! म्हणाला…
रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 विश्वचषक: विराट कोहली आणि रोहित शर्मा दोन्ही दिग्गजांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. मात्र, कोहली आणि रोहितने वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळण्याची या दोन्ही दिग्गज फलंदाजांची इच्छा असल्याचे मानले जात आहे. पण, भारतीय संघाला यावर्षी खूप कमी वनडे सामने खेळायचे आहेत. तसेच, 2 फॉरमॅटमधून दूर राहिल्यानंतर कोहली आणि रोहित पुढील 2 वर्षांपर्यंत याच फॉर्मात खेळू शकतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. (2027 World Cup Kohli Rohit)
न्यूज 24 सोबत बोलताना हरभजन सिंगने विराट आणि रोहितच्या भविष्यावर आपले मत मांडले आहे. भज्जी म्हणाला की, 2 फॉरमॅटमधून दूर राहिल्यानंतर विराट आणि रोहितसाठी 2027 विश्वचषकपर्यंत खेळणे कठीण (Difficult to play till 2027 World Cup) होईल. त्याने धोनीचे उदाहरण देत म्हटले की, जेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता, तेव्हा आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघत होत्या. मात्र, निवृत्तीनंतर माहीच्या फॉर्मवरही परिणाम झाला. (Harbhajan Singh Virat Rohit future)
Comments are closed.