Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार

जळगाव : पुण्यातील फ्लॅटवर झालेल्या रेव्ह पार्टीवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हेही यात अडकले आहेत. पोलिसांनी प्रांजल यांच्यासह चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तत्पूर्वी या प्रकरणात धक्कादायक आरोप करत एका बहुउद्देशीय संस्थेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर, रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला असता, आज अहवालातील माहिती माध्यमांसमोर दिली. त्यामध्ये, पुण्यातील रेव्ह पार्टी हे मोठं मानवी तस्करीचं रॅकेट असल्याचं सांगत खडसेंच्या जावयावर गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत. त्यावर, आता रोहिणी खडसेंचे वडिल आणि आमदार एकेनाथ खदसननी (एकनाथ खदसे) पलटवार केला. दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना असेही खडसेंनी म्हटले.

रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याप्रमाणे बोलत आहेत. विशेष म्हणजे त्या जी माहिती सांगत आहेत, वास्तविक पाहता ती पोलिसांनी सांगायला पाहिजे रोहिणी खडसे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे, चाकणकर या चेकाळून बोलत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आरोपी प्रांजल खेवलकरांचे सासरे एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवरुन पलटवार केला. तसेच, एखादी खासगी माहिती ते अशाप्रकारे कशी सार्वजनिक करू शकतात, ती गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी करणे योग्य आहे, असेही खडसेंनी म्हटले.

आपण आपल्या जावयाची बाजू घेणार नाही, दोषी असेल तर त्याला फाशी द्यायला हवी, हा मात्र बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. एकाही मुलीची त्याच्या विरोधात तक्रार नाही, खासगी आयुष्य आहे, एसआयटी पेक्षा केंद्राच्या एखाद्या तपास यंत्रणाद्वारे तपास केला जावा. सीबीआकडून या प्रकरणाचा तपासा करावा, असेही खडसेंनी एसआयटी स्थापनेसंदर्भाने म्हटले. तर, रुपालीताईंनी लोढा प्रकरणातही लक्ष घालावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकरांकडे केली. याशिवाय अधिकचे बोलणे टाळले. दरम्यान, रुपाली चाकणकरांचे आरोप हे राजकीय द्वेषातून असल्याचे नाथाभाऊंनी सूचवलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=f-4fxlcu3l0

काय म्हणाल्या चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सानवी संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. भीषण आणि भयावह अहवाल आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडीत छापा टाकत कारवाई करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर आणि त्यांचा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन गांजा, 10 मोबाईल, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. हडपसरच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले होते. आरुष नावाने हा नंबर सेव्ह होता, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

पिच्चरमध्ये काम देतो म्हणत मुलींना बोलावलं

लोणावळा येथे सगळ्यांना बोलण्यात आलं होत, प्रांजल यांनी मुलींना पिच्चरमध्ये काम देतो म्हणून बोलवले आहे. गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी बोलवल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यताही रुपाली चाकणकर यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! 252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो, पुणे रेव्ह पार्टीप्रकरणाचा अहवाल, खडसेंच्या जावयावर गंभीर आरोप

आणखी वाचा

Comments are closed.